December 22, 2024
क्रिडा

महाराष्ट्राच्या १२ सदस्यांनी कानपूरमध्ये नानचाकू स्पोर्ट्स रेफ्री सेमिनारमध्ये मिळवले यश.

महाराष्ट्र २४ तास, पिंपरी-चिंचवड, दि. 07 : नानचाकू असोसिएशन ऑफ इंडियाने ४ ऑगस्ट २०२४ रोजी नानचाकू स्पोर्ट्स रेफ्री टेकनिकल सेमिनारचे आयोजन केले. या सेमिनारमध्ये देशभरातील १५ राज्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महाराष्ट्राच्या १२ सदस्यांनी देखील या सेमिनारमध्ये भाग घेऊन यश प्राप्त केले आहे.

महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झालेल्या या सदस्यांमध्ये दीपक शिर्के (सेक्रेटरी, नानचाकू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र), स्वरूप एकावडे, बाळासाहेब बिडकर, अनिल शिंदे, श्वेता धनवडे, विजय कांबळे, दीपक भुतांबरे, वैष्णवी नवले, सृष्टी पिसाळ, जान्हवी शेलार, अभिनव जाधव, आणि रिदम तिवारी यांचा समावेश होता.

या सर्वांनी रेफ्री टेकनिकल सेमिनारमध्ये आपली उत्कृष्ट कामगिरी सादर करून यश प्राप्त केले. नानचाकू असोसिएशन ऑफ इंडियाचे चेअरमन डॉ. रोहित सक्सेना, अध्यक्ष विजय कपूर, जनरल सेक्रेटरी बाबुल वर्मा, टेकनिकल डायरेक्टर आर. पी. शर्मा, आणि टेकनिकल कमिशन विजय कुशवाह यांनी महाराष्ट्राच्या टीमचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित केले.

या सेमिनारमध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या सदस्यांनी आपली कौशल्ये दाखवून नानचाकू स्पोर्ट्स रेफ्री म्हणून यशस्वीपणे आपला ठसा उमटवला आहे.