पुणे राष्ट्रीय सातारा

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने महामार्गांवरील अतिक्रमणे तीन दिवसांत हटवण्याचे केले आवाहन.

महाराष्ट्र २४ तास, पिंपरी-चिंचवड, दि. 09 : पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक, खेड (राजगुरुनगर) ते सिन्नर (नाशिक), पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग, तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर झालेली अनधिकृत अतिक्रमणे आणि परवान्याविना बांधण्यात आलेली बांधकामे तीन दिवसांच्या आत स्वखर्चाने हटवावी, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने केले आहे.

पुणे-सोलापूर महामार्ग क्र. ६५ वर हडपसर ते हिंगणगाव (इंदापूर), पुणे-नाशिक महामार्ग क्र. ६० वर नाशिक फाटा ते चांडोली, खेड (राजगुरुनगर) ते सिन्नर (नाशिक) महामार्ग क्र. ५४८ डी वर तळेगाव-चाकण-शिकापूर, पुणे-सातारा महामार्ग क्र. ४८ वर देहूरोड (पुणे) ते शेंद्रे (सातारा), आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग क्र. ९६५ वर हडपसर ते दिवेघाट या मार्गांवरील जमिनींवर काही मिळकत धारकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केल्याचे आढळून आले आहे.

अतिक्रमण काढण्यासाठी प्राधिकरणाने आणि जिल्हा प्रशासनाने वारंवार सूचना दिल्या असतानाही, काही अतिक्रमणधारकांनी अद्यापही त्यांची अतिक्रमणे हटवलेली नाहीत. त्यामुळे, या भागातील रस्त्याच्या दोन्ही बाजूंस केलेली अनधिकृत अतिक्रमणे आणि बांधकामे स्वखर्चाने काढून टाकावीत, अन्यथा प्राधिकरणाच्यावतीने राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण (जमीन आणि वाहतूक) अधिनियम २००२ नुसार ती अतिक्रमणे हटवण्यात येतील, आणि या कारवाईचा खर्च व दंड संबंधित अतिक्रमणधारकांकडून वसूल केला जाईल, अशी माहिती प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *