December 22, 2024
पुणे

पुणे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून डॉ. रवींद्र ठाकूर यांची नियुक्ती


महाराष्ट्र २४ तास, पिंपरी-चिंचवड, दि. 27:

पुणे जिल्ह्याचे नवीन जिल्हा माहिती अधिकारी म्हणून डॉ. रवींद्र ठाकूर यांनी पदभार स्वीकारला आहे. मावळते जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांनी त्यांचे स्वागत केले आणि औपचारिकपणे पदभार सोपवला.

डॉ. रवींद्र ठाकूर हे मूळ नाशिकचे रहिवासी असून, त्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या शाखेत पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी जनसंपर्क क्षेत्रात पीएचडी पूर्ण केली असून, सुरुवातीला दैनिक जनशक्ती आणि देशदूत या वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता केली आहे. याशिवाय, त्यांनी वृत्तपत्र क्षेत्रात अध्यापनाचे कार्य देखील केले आहे.

डॉ. ठाकूर यांनी २००७ मध्ये माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या सेवेत प्रवेश केला होता. त्यांनी अलिबाग-रायगड, मंत्रालय मुंबई, नाशिक, आणि छत्रपती संभाजी नगर येथे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. आता अहमदनगर येथून त्यांची पुणे जिल्हा माहिती अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पुण्यातील नवीन जिल्हा माहिती अधिकाऱ्याचा कार्यभार स्वीकार.

Related Posts