कोकण कोल्हापूर चिंचवड पिंपरी पुणे भोसरी महाराष्ट्र मावळ मुळशी राजकारण राष्ट्रीय विदर्भ शिरूर शैक्षणिक सांगली सातारा सामाजिक

मातंग समाजाने मेट्रो प्रशासन विरोधात पुकारलेले “अमरण उपोषण” अखेर तात्पुरते स्थगित! मेट्रो प्रशासन नमले सर्व मागण्या मान्य; लोकसेवक युवराज दाखले

युवा नेते अरुण जोगदंड यांनी मेट्रो प्रशासन विरोधात पुकारलेले “अमरण उपोषण” अखेर तात्पुरते स्थगित! मेट्रो प्रशासन नमले सर्व मागण्या मान्य ;

महाराष्ट्र २४ तास, पिंपरी- दि. १८ – प्रतिनिधी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या निगडी येथील पूर्णाकृती पुतळ्यास महा मेट्रोच्या कामकाजामुळे पडलेल्या क्रॅक्स व बीआरटी बस स्थानकास साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नाम फलकाची तोडफोड करून केलेले विडंबन याच्या निषेधार्थ मातंग समाजातील प्रमुख पदाधिकारी यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास दुग्ध अभिषेक करून सुरुवात करण्यात आली होती.

महा मेट्रो प्रशासनानं या उपोषणाची गंभीर अशी दखल घेऊन उपोषण करते यांना लेखी स्वरूपामध्ये पुन्हा अशा प्रकारची घटना घडणार नाही व घडलेल्या घटनेची माफी मागून दुरुस्ती करण्यासंदर्भात लेखी उत्तर दिल्याने प्रमुख पदाधिकारी यांचे चालू केलेलं आमरण उपोषण नारळ पाणी घेऊन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

अमरण उपोषणकर्ते यांच्या मागण्या मेट्रो प्रशासनाने लेखी स्वरूपात मान्य करण्यात केल्या.

1) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाचा नामफलक एलईडी मध्ये येत्या पंधरा दिवसाच्या आत मध्ये लावणार.

2) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाची झालेली पडझड हे तात्काळ दुरुस्त करून देणार यापुढे अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकालगत कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही,अशी लेखी हमी देण्यात आली.

3) तसेच मेट्रो प्रशासन व पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन यांची एकत्र बैठक हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लावून सा. लो. अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकास पुतळ्यासाठी 20 गुंठे जागेची मागणी प्रस्ताव तयार करून देण्यासाठी योग्य ते सहकार्य करणे.

अशा प्रकारच्या मागण्यांची मान्यता मेट्रो अधिकारी यांनी उपोषण स्थळी येऊन लेखी पत्र देत आश्वासन दिले.

यावेळी ज्येष्ठ नेते भाऊसाहेब आढागळे,  माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, माजी नगरसेवक गणेश लोंढे, ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे, बहुजन विकास आघाडी संस्थापक अध्यक्ष संजय धुतडमल, सा. लो. अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष संजय ससाणे,जेष्ठ नेते संदिपान झोंबाडे, सा लो आण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव अध्यक्ष नितीन घोलप,शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले, सुनिल भिसे,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती मा.अध्यक्ष डी पी खंडाळे, रामदास कांबळे,राजु चव्हाण, शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे , पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले ,सुरेश भिसे,शिवशाही व्यापारी संघ पि चि शहर उपाध्यक्ष अविनाश गायकवाड,महासचिव सुरज कांबळे,शिवशाही व्यापारी संघ महीला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा सीमाताई भालेराव,मारूती जाधव,शिवशाही वाहतुक आघाडी शहर अध्यक्ष अनिल तांबे,शिवाजीराव साळवे अनिल तांबे, अविनाश कांबीकर,अमोल लोंढे, लक्ष्मण वैरागे, विक्रम गायकवाड, लहुजी शक्ती सेना युवक अध्यक्ष अक्षय पौळ,गणेश ताटे ,रूषीकेश वाघमारे,ईश्वर तायडे,आर पी आयचे माणिक पौळ, क्रांतिवीर विचार मंचाचे पदाधिकारी अविनाश शिंदे,बाबासाहेब पाटोळे,राजु आवळे,शंकर खवळे,लहू अडसूळ,धीरज सकट,अविनाश गायकवाड,सागर कापसे,बाप्पू झाडे,गणेश तुपे,बाळू कुचेकर,अंकुश फुलवले,राजु वानखेडे,सोमनाथ कांबळे, आदी उपस्थित होते.

आदी प्रमुख पदाधिकारी समाज बांधव उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *