महाराष्ट्र २४ तास, पिंपरी-चिंचवड, दि. 27: पुणे जिल्ह्याचे नवीन जिल्हा माहिती अधिकारी म्हणून डॉ. रवींद्र ठाकूर यांनी पदभार स्वीकारला आहे. मावळते जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांनी त्यांचे स्वागत केले आणि औपचारिकपणे पदभार सोपवला. डॉ. रवींद्र ठाकूर हे मूळ नाशिकचे रहिवासी असून, त्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या शाखेत पदव्युत्तर पदवी प्राप्त केली