देहूरोड मध्ये गोळीबाराचा थरार एकाचा जागीच मृत्यू; तर दोघे गंभीर जखमी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल…

महाराष्ट्र २४ तास, दि. १४ फेब्रुवारी: देहूरोड मध्ये गोळीबाराचा थरार एकाचा जागीच मृत्यू; तर दोघे गंभीर जखमी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
वाढदिवस कार्यक्रम सुरू असताना अचानक काही टोळक्या कडून गोळीबार करण्यात आला आहे. देहूरोडच्या गांधीनगरमध्ये ही घटना घडली आहे. वाढदिवस कार्यक्रम साजरा करीत असताना ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
देहूरोड पोलीस ठाणे हद्दीतील या गोळीबार थरार घटनेनंतर नव्याने रुजू झालेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे व त्यांच्या पथकाने तातडीने गोळीबरातील आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
देहूरोड मधील नागरिकांना सुरक्षेची हमी देत आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांचेवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असे महाराष्ट्र २४ तास न्यूज शी बोलताना सांगितले.